काळजाला भिडली थेट...उद्योगमंत्र्यांच्या माता - पित्यांची भेट

सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या रत्नागिरीतील उद्‌घाटनानंतर, अध्यक्षा डॉ. सुनीताताई मोडक यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी भेट दिली. या वेळी सामंत कुटुंबियांनी संस्थेचे पदाधिकारी व सुनीताताई यांचा सन्मान करून भावी कार्याला शुभेच्छा दिल्या. उद्योगमंत्र्यांचे वडील सन्मा. रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांनी त्यांच्या साधेपणातून व विनोदी स्वभावातून सर्वांशी संवाद साधत समितीच्या कार्याचे कौतुक केले. सामंत कुटुंबीयांच्या या प्रेमळ सन्मानाने सुनीताताई भावूक झाल्या व संस्थेला समाजसेवेत नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.escription.

प्रताप पवार

9/19/20251 min read

महाराष्ट्रातील हजारो संस्थांच्या एकजुटीने... समाजसेविका डॉ.सौ.सुनीताताई मोडक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचा उदघाटन सोहळा, शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी, स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे.... महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्मा. श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते पार पडला.

या उदघाटन सोहळ्या नंतर राज्यभरातून आलेले सेवाभावी संस्थांचे अनेक पदाधिकारी यांच्या समवेत डॉ. सौ. सुनीताताई मोडक यांनी उद्योग मंत्र्यांच्या, पाली येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी उद्योगमंत्री यांच्या आई-वडिलांनी सर्वांचा यथोचित सन्मान करून, सेवाभावी संस्था प्रबोधन समितीला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे वडील सन्मा. रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत यांनी, या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. आणि दोन्ही उभयतांनी, समितीच्या पुढील वाटचालीस सर्वाना आशीर्वाद दिला.

यावेळी सन्मा. रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत यांनी सर्वांसोबत मोकळेपणे आणि आपल्या विनोदी शैलीत सर्वांशी चर्चा केली. आणि सामंत कुटुंबीय समितीच्या सोबत कायम राहील अशी ग्वाही दिली.

एका मंत्र्याच्या घरचे साधेपण आणि संस्काराची झलक कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्मा.रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत यांची शिकवण सर्वांनी अनुभवली. याच शिकवणुकीतून तयार झालेले शांत, संयमी, अभ्यासू नेतृत्व म्हणजे सन्मा. उदयजी सामंत आणि किंग नव्हे तर किंगमेकर अशी ख्याती असलेले, एक कॉल -विषय सॉल म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार सन्मा. किरण ऊर्फ भैया सामंत आहेत.

यावेळी सामंत कुटुंबियांनी केलेल्या सन्मानाने सन्मा. सुनिताताई भावुक झाल्या. सेवाभावी संस्था प्रबोधन समिती सर्वाना बळ देण्यासाठी उभी आहेच... परंतु हे बळ देत असताना, एका आईने, लेकीची ओटी माहेरच्या साडी-चोळीने भरल्याने, समाजातील दुर्बल घटकानसाठी काम करत असताना, आता हजार हत्तीचे बळ प्राप्त झाल्याचे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोरजी सावंत यांनी विशेष प्रयत्न करून...ही अविस्मरणीय भेट घडवून आणली.