सेवाभावी संस्था प्रबोधन समिती चे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते उदघाटन.
महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थांना सक्षम करण्यासाठी, ज्येष्ठ समाजसेविका व पुरस्कारविजेत्या डॉ. सुनीताताई मोडक यांनी 13 सप्टेंबर 2024 रोजी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना केली. या समितीचे उद्घाटन उद्योगमंत्री सन्मा. उदयजी सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीत पार पडले. यावेळी त्यांनी सेवाभावी संस्थांच्या कार्याचे कौतुक करून, समाजहितासाठी पक्षविरहित सेवाभाव जपल्यास मोठे प्रबोधन साध्य होईल असे प्रतिपादन केले. समितीची राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर विस्तृत कार्यकारी रचना जाहीर करण्यात आली असून, पुढील कार्यासाठी सर्व बाजूनी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.
प्रताप पवार
9/19/20251 min read


महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थांना सर्व बाजूनी सक्षम करण्यासाठी, गेली 32 वर्ष समजकारणाचा वसा घेऊन काम करणाऱ्या,ज्येष्ठ समाज सेविका, राष्ट्रीय -आंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डॉ.सौ.सुनीताताई मोडक यांनी हजारो संस्थांना एका छताखाली आणून, दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी, सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना केली. या समितीचे उदघाटन, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्मा.श्री. उदयजी सामंत साहेब,यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना सन्मा. उदयजी सामंत यांनी, ज्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माझ्या राजकीय जीवनाचा पाया तयार केला, त्याच पद्धतीच्या महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थांच्या समितीचे उदघाटन माझ्या हस्ते झाले याचा मला अतिशय आनंद होत आहे असे गौरवपर उदगार काढले.
रत्नागिरी ही अशी भूमी आहे की इथे सुरू झालेलं कोणतंही कार्य अर्धवट राहत नाही. सेवाभावी संस्था या नावालाच ‘सेवाभाव’आहे. राजकीय रंग न देता जर आपण सेवाभाव जपला, तर या संस्था समाजप्रबोधनाचं मोठं कार्य करू शकतात असं वक्तव्य केलं.
सेवाभावी संस्था म्हणजे समाजहितासाठी निरपेक्ष भावनेनं काम करणं. या संस्था पक्षविरहित राहून समाजाला दिशा देतात तेव्हाच त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं प्रभावी ठरतं. समाजामध्ये निर्माण होणारे गैरसमज, अन्याय किंवा राजकीय उपयोगासाठी होणारी चळवळ यावर प्रकाश टाकण्याची ताकद सेवाभावी संस्थांकडे असल्याचं सांगितले.
आज या कार्यक्रमात वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलेले पाहून समाधान वाटलं. हीच खरी ताकद आहे – समाजहितासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची. माझं राजकारण हे देखील सेवाभावी संस्थेतून सुरू झालं. समाजकारणातून मिळालेलं जनतेचं प्रेम आणि विश्वास आजही मला पुढे जाण्याची ताकद देतं. या संस्थेला पुढील कार्यासाठी माझ्या शुभेच्छा! रत्नागिरी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य दिलं जाईल, याची खात्री या कार्यक्रमानिमित्त दिली.
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना करत असताना, सुनीताताई यांनी महाराष्ट्रातील कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे अशा सहा विभागातून राज्य कार्यकारिणी, प्रकोष्ठ समिती, प्रत्येक विभागाची एक समिती, जिल्हा समिती आणि तालुका समिती अशी रचना केली आहे.
यामध्ये राज्यकारिणी मध्ये राज्यअध्यक्षा म्हणून डॉ. सौ. सुनीताताई काम पाहत आहेत. तर प्रकोष्ठ समितीची धुरा सौ. शालिनीताई ठाकरे यांनी घेतली आहे.
राज्य कार्यकारिणी मध्ये,
कार्याध्यक्षा -अनिता तीपायले,सचिव-लक्ष्मण डोळस, खजिनदार-डॉ.सतीश जगताप, सहसचिव प्रताप पवार, प्रमुख सल्लागार-भगवंत ऊर्फ बाळा भाऊ पाठक, डॉ. संजय पाटील, राज्यसंपर्क प्रमुख-संचित यादव, किशोर सावंत, नीता पांगुळ, उत्तम पाटील, नंदकिशोर हत्ती हंबीरे, राहुल व्यवहारे, अरविंद पवार, दिनेश भोईर, राज्य सदस्य-कल्याणी कुलकर्णी, शरद दादा उगले, विनायक खानविलकर, दीपाली कुळये, जितेंद्र मेटकर, पराग घारपुरे, प्रवीण देवरे, महेश्वर तेटाबे, संजय बगे, सुनील फुलारी, संजय निर्मळ, विकास पाटोळे, भारती माळी, रोहिणी पवार अशी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सौ. शालिनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रकोष्ठ समिती मध्ये उपाध्यक्ष-किरणताई बढे, सचिव-अमिता बोरसवे, राज्य समन्वयक-अमोल मोडक, निलेश सोनावणे, राज्य रोजगार जनसंपर्क प्रमुख-प्रदीप सोनार, राज्य संपर्क प्रमुख-सुजाता ताई डेरे, संध्या कुलकर्णी, राज्य सी. एस.आर. संपर्क प्रमुख-रवींद्र चंदात्रे, राज्य सदस्य-चंदा ताई गान, संदीप परब, श्रेया तटकरे, सई संघाई, मिलिंद गान, महेंद्र सोभागे, दिलिप तांदळे, माधवराव पाटील, वैशाली म्हैसदुने, अनिल न्याहाळदे, प्रशांत खरे, प्रियांका समुद्र यांचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुनीताताई मोडक, सुजाताताई डेरे, बाळाभाऊ फाटक, डॉ. सतीश जगताप, सचिव लक्ष्मण डोळस समीरजी घारे, राजू भाटळेकर ,शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, उद्योजक संभाजी काजरेकर, विनायक भुसारे-पाटील,बहुजन समाज नेते सुरेश भायजे,डॉ. प्रकाश भांगरत, उद्योजक सचिन माजळकर,आदी मान्यवर,पदाधिकारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शरददादा उगले यांनी केले.















