सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचे उदघाटन,महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्मा. श्री.उदय सामंत साहेब यांच्या हस्ते होणार.
रत्नागिरी येथे शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचे राज्यस्तरीय उद्घाटन होणार आहे. मा. डॉ. सौ. सुनिताताई मोडक यांच्या अध्यक्षतेखाली, 17000 संस्था एकत्र येऊन सामाजिक कार्याला बळकटी देणार आहेत. महाराष्ट्रातील सहा विभागांतून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
प्रताप पवार
9/4/20251 min read


गेली 32 वर्ष समाजकारणात असणाऱ्या आणि कल्याणी महीला बहुद्देउशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून, गेली 20 वर्ष महाराष्ट्रभर जनसेवा करणाऱ्या, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, संस्थापक अध्यक्षा सौ. सुनीताताई मोडक, यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्रातील 17000 सेवाभावी संस्था एकत्र करून सेवाभावी संस्था प्रबोधन समिती ची स्थापना करण्यात येणार आहे.
शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी, सकाळी 12 वाजता महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री सन्मा.श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली, कल्की सामाजिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सन्मा.सौ. शालिनीताई ठाकरे, आमदार आणि उद्योजक सन्मा.श्री. किरणजी(भैयाशेट) सामंत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सर्व शासकीय यंत्रणाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये, रत्नागिरी येथे सेवाभावी संस्था प्रबोधन समिती या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेचे उदघाटन होणार आहे.
गणपतीपुळे येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन, ही राज्यस्तरीय समिती, महाराष्ट्रातील हजारो सेवाभावी संस्थांचे नेतृत्व करून त्यांना सर्व बाजूनी सक्षम करण्यासाठी काम करणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महाराष्ट्रातील 6 विभागातून हजारो सेवाभावी संस्थांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्था एकत्र येण्याच्या,ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि सर्व संस्थानी एकत्र येऊन,आपला विकास करून घ्यावा याकरिता, सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्य अध्यक्षा मा.डॉ सौ. सुनिताताई मोडक यांनी महाराष्ट्रातील सर्व सेवाभावी संस्थांना यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





