पालघर जिल्ह्यामध्ये, शास्वत पर्यटनासाठी विशेष सत्राचे आयोजन

पालघर जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी आयोजित विशेष सत्रात उद्योगपतींनी प्रकल्प जाहिराती आणि सरकारी मदतीवर मार्गदर्शन केले.

प्रताप पवार

12/22/20251 min read

पालघर डिस्ट्रिक्ट टूरीझम डेव्हलोपमेंट वेल्फेअर असोशीएशन आणि नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने, पालघर जिल्ह्यातील शास्वत पर्यटन, भविष्यातील पर्यटन, पर्यटनयुक्त पालघर या सर्व विषयांवर व्यवसाईकांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यासाठी, टुरिझम प्रकल्पाचे जाहिरात आणि मार्केटिंग कसे करायचे, शासनाच्या माध्यमातून टुरिझमसाठी मदत कशी करता येईल याकरिता, रविवार दिनांक 21/12/2025 रोजी, बियॉन्ड अँड सँड रिसॉर्ट, केळवा, पालघर येथे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी वीणा वर्ल्ड पर्यटन संस्थेचे संस्थापक श्री. सुधीरभाऊ पाटील, प्रसिद्ध उद्योगपती डॉ. राजीव चुरी,पालघर डिस्ट्रिक्ट टूरीझम डेव्हलोपमेंट वेल्फेअर असोशीएशन चे अध्यक्ष श्री. जगदीश ठाकूर,नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर चे अध्यक्ष श्री. निमिष सावे, केळवा बीच असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजय घरत उपस्थित होते.