डॉ.सौ. सुनीताताई मोडक यांना वसंत गौरव पुरस्कार प्रदान

डॉ. सौ. सुनीताताई मोडक यांना ३२ वर्षे समाजसेवेबाबत कार्य केल्याबद्दल व महाराष्ट्रातील १९००० सेवाभावी संस्थांच्या नेतृत्वासाठी वसंत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ठ सामाजिक कार्याचा आदर आहे.

प्रताप पवार

8/28/20251 min read

कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक, अध्यक्ष, गेली 32 वर्ष समाजकारणाचा वारसा जपणाऱ्या. आणि सेवाभावी संस्था प्रबोधन समिती च्या माध्यमातून महाराष्ट्रातील 19000 सेवाभावी संस्थांच्या राज्यध्यक्षा डॉ. सौ सुनीताताई मोडक

यांना वसंत गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

कै.दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील मेमोरियल फाउंडेशन नाशिक यांच्यामाध्यमातून,

सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील (मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अहिल्या नगर) यांच्या हस्ते दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी,हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार यापूर्वी सन्मा.डॉ.प्रकाश आमटे, सन्मा. नीलिमा मिश्रा, शिवम प्रतिष्ठान घारेवाडी, माऊली प्रतिष्ठान अहिल्यानगर, स्नेहालय सामाजिक संस्था,अहिल्या नगर,अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या उत्तुंग सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक नामवंत दिग्गज व्यक्ती व संस्था यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी करत असलेल्या डॉ. सौ. सुनीताताई मोडक यांचे कार्य देखील अत्यंत बहुमोल आणि उल्लेखनीय असल्याने, हा पुरस्कार म्हणजे उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा मनःपूर्वक आदर आहे .