शिव स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

शिव स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी लांजा येथील डॉ. एकलूरे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. रेड क्रॉस ब्लड बँक, रत्नागिरी यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी विविध संस्था, उद्योजक व स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य करून शिबिराला यश मिळवून दिले.

प्रताप पवार

8/20/20251 min read

रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी, डॉ. एकलूरे हॉस्पिटल, लांजा येथे, शिव स्वराज्य फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून, रेड क्रॉस ब्लड बँक रत्नागिरी यांच्या सहयोगाने, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपून, अनेक रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन,रक्तदानाचे पुण्यकार्य करून उस्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर रक्तदान शिबीराकरिता डॉ. स्वरूप एकलूरे यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली. कोकणभूमी डेव्हलोपर चे मालक नितीन कदम आणि लाईफ टाइम फर्निचर चे मालक सचिन माजळकर हे या शिबिराचे सहयोगी भागीदार म्हणून सोबत होते.

तसेच धर्मेंद दाभोलकर, विवेक कनावजे, महेंद्र राजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश ऊर्फ राजू जाधव, डॉ. श्रीराम कुलकर्णी, अनुष्का जाधव, विनायक खानविलाकर, डॉ. एकलूरे हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि शिव स्वराज्य फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी मेहनत घेतली.