राजापूरची कन्या बनली सुवर्णपदक विजेती.

परी संजय जडयार यांनी लांजा आग्रे हॉलमधील शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तिला सर्व स्तरांतून अभिनंदन.

प्रताप पवार

8/28/20251 min read

नुकत्या काळात लांजा आग्रे हॉल येथे आयोजित शालेय तायक्वांदो २०२५/२०२६ स्पर्धेमध्ये राजापूर तालुक्यातील ओणी गावातील कन्या कुमारी परी संजय जडयारने लांजा तालुका तायक्वांदो फिटनेस अकॅडमीचे प्रतिनिधीत्व करत सुवर्णपदक जिंकले. या यशस्वी स्पर्धेमुळे परी जडयार यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

परी जडयार हि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका सचिव संजय विष्णू जडयार यांची कन्या असून, तिच्या या कामगिरीबद्दल विविध स्थरांतून त्यांचे खूप अभिनंदन होत आहे. तिने राष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक सौ. तेजस्विनी आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदोच्या प्रशिक्षणासाठी कष्ट घेतले आहे आणि त्याचे फलित म्हणूनच या स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला.

परीच्या यशामागे तेजस पावसकर सर, गौरव खेडेकर सर, शीतल आचरेकर मॅडम आणि आई पायल जडयार या सर्व गुरूंचे विशेष योगदान आहे, ज्यांच्या प्रेमळ आणि कठोर प्रशिक्षणामुळेच परीने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. शिव स्वराज्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीने परी जडयार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

ही कामगिरी परी जडयारसाठी एक नवा टप्पा ठरला असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही यशस्वी सुरुवात आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेत परीने आपले कौशल्य अधिक उंचावून आपल्या तालुक्याचे आणि राज्याचे नाव उज्वल करावे, अशी अपेक्षा आहे.